असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार   

माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांचा खुलासा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हाच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा खुलासा माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी केला आहे. याबाबत मोठा पुरावाही समोर आला आहे. आदिल राजा म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानचे लष्करप्रमुखच नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचे उच्च अधिकारीही सहभागी होते. 
 
डीजी मोहम्मद असीम मलिक आणि महम्मद शहाब असलम यांचीही या हल्ल्यात थेट भूमिका होती, ते हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांशी थेट संपर्कात होते. पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठिंबा देते. लष्कर पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या हँडलर्सद्वारे भारतात काश्मीरमध्ये रक्तरंजित खेळ खेळते. मला माहित आहे की, कोणत्या आयएसआय अधिकार्‍यांनी हे केले. असीम मुनीरने हे ऑपरेशन करण्यासाठी एक चाल खेळली होती. भारताकडून झालेल्या पराभवानंतर असीम मुनीर अस्वस्थ झाला होता आणि तो आपले स्थान वाचवण्यासाठी काहीतरी मोठे करू इच्छित होता.दरम्यान, आदिल राजा यांच्या विधानावरून आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की, पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग होता आणि लष्करप्रमुख असीम मुनीर त्या हल्ल्याचे सूत्रधार होते.

Related Articles